आता प्रत्येक शेतकरी बांधवांना पी.एम.सी किसान योजना अंतर्गत सहा हजार (६०००) रुपये मिळणार.....!
शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आणि शेतकरी बांधव हा अन्नदाता आहे, म्हणूनच आपल् सरकार शेतकरी बांधवांसाठी नवीन नवनवीन योजना घेऊन येत असते ज्यामुळे शेतकरी बांधवाला फायदा होईल आज आपण अशाच एका योजनेबद्दल आपल्याला सांगणार आहोत, ज्याने आपल्या शेतकरी बांधवांना सहा हजार रुपयापर्यंत फायदा होऊ शकतो, या योजनेचे नाव म्हणजे पंतप्रधान किसान योजना व पीएमसी किसान योजना म्हणूनही ही योजना ओळखली जाते..
*:-वैशिष्ट्ये,🔖
:-ही योजना केंद्र सरकार योजना आहे,
:-ही योजना भारत सरकारने 1 डिसेंबर 2018 पासून सुरू केली आहे,
:-या योजनेमध्ये जमीन असणाऱ्या शेतकरी कुटुंबीयांना तीन समान टप्प्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाते, (पती पत्नी व अठरा वर्ष आतील मुलं अल्पवयीन मुल यांना हा निधी दिला जातो असं कुटुंब योजनेसाठी पात्र ठरतं),
:-ही योजना जरी केंद्र सरकारची असली तरी राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेश प्रशासन संबंधित व्यक्तीचा पात्रता निश्चित करतात,
:-या योजनेचा निधी थेट शेतकरी कुटुंबीयांच्या बँक खात्यात जमा होतो,
:-सुरुवातीला फक्त असे शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकत होते ज्यांच्याकडे दोन हेक्टर शेती आहे पण आता जमीन कितीही असेल तरीपण शेतकरी बांधव इतर अटी त जर बसत असेल तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकतो,
*:-पात्रता,📝
(1) कुठलीही संस्था जिच्या नावे जमीन आहे ती संस्था अपात्र ठरते,
(2) पदावर असलेले म्हणजेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, इत्यादी या योजनेस अपात्र ठरतात,
(3) माझी किंवा विद्यमान खासदार, आमदार, मंत्री राज्यमंत्री, महापौर, किंवा जिल्हा पंचायत तिचे अध्यक्ष, इत्यादी या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत,
(4) जे सरकारी कर्मचारी आहेत हे या योजनेचा लाभ घेऊ शकतात पण फक्त चतुर्थ श्रेणी किंवा सहाय्यक कर्मचारी या योजनेसाठी पात्र ठरतात,
(5) सेवानिवृत्त कर्मचारी ज्याचे मासिक पेन्शन १०,०००₹ किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कर्मचारी या योजनेसाठी अपात्र ठरतात परंतु जे सरकारी कर्मचारी चतुर्थ श्रेणी व सहाय्यक कर्मचारी आहे त्यांचे पेन्शन १०,०००₹ पेक्षा जास्त जरी असेल तरीही ते या योजनेस पात्र ठरतात,
(6) ज्यांनी मागील वर्षात कर भरला आहे ते शेतकरी बांधव या योजनेस पात्र ठरतात,
(7) डॉक्टर, अभियंते, वकील, चार्ट अकाउंटंट, आणि वस्तूविशारद, यासारखे व्यवसायिक या योजनेतून वगळण्यात आलेली आहे,
(8) थोडक्यात सांगायचं म्हटलं तर या योजनेला फक्त असे व्यक्ती पात्र ठरतात ज्यांना त्या योजनेची खरोखरच गरज आहे,
*:- लागणारी आवश्यक कागदपत्रे 📝
- बँक पासबुक,
- आधार कार्ड,
- ७/१२ किंवा ८ अ उतारा,
- मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक असावा,
- आधार कार्ड बँक अकाउंट ची लिंक असावं,
* :- नाव नोंदणी,
:- आपण स्वतः कागदपत्रे घेऊन तलाठी कार्यालयात जाऊन नाव नोंदणी करू शकता,
:- ग्राहक सेवा केंद्र व इंटरनेट कॅफे मध्ये ही जाऊन आपण नाव नोंदणी करू शकता मात्र तिथे आपल्याला काही रक्कम भरावी लागेल,
:-आपण स्वतः पीएम किसान पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करू शकता मात्र ते आपल्याला काळजीपूर्वक करावा लागेल.
P.M किसान पोर्टल link :-https://pmkisan.gov.in/