आता प्रत्येकाला मिळणार 2 लाखा पर्यंत सुरक्षा विमा ई-श्रम-कार्ड योजनेमार्फत,
आज आपण आजच्या ब्लॉग मध्ये ई श्रम कार्ड योजने बद्दल जाणून घेणार आहोत.
- ई-श्रम-कार्ड म्हणजे काय ?
- ई-श्रम-कार्ड कसं काढतात ?
- ई-श्रम-कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती ?
- ई-श्रम-कार्ड चे फायदे काय ?
- ई-श्रम-कार्ड माहिती,
- 26 ऑगस्ट 2021 पासून ई-श्रम-कार्ड योजना सुरू करण्यात आली असून ती योजना केंद्र सरकार व रोजगार मंत्रालयात भारत सरकारकडून सुरू करण्यात आली आहे.
- सर्वसामान्य जनते साठी म्हणजेच मजूर वर्गासाठी ही योजना आहे उदाहरणार्थ:- सुतार, लोहार, गवंडी, शेतमजूर, भाजी विक्रेता, रिक्षाचालक, घरगुती काम करणाऱ्या महिला, सामान्य सेवा केंद्र, रस्त्यावरील विक्रेता, दूध घालणारी शेतकरी, स्थलांतरित कामगार, इत्यादी.....
- ई-श्रम-कार्ड काढण्यासाठी लागणारी पात्रता,
:- ई-श्रम-कार्ड काढण्यासाठी तुमचे वय सोळा वर्षे ते 59 वर्ष यादरम्यान असावे.
:-अर्ज करणारा व्यक्ती कुठलेही टॅक्स व इन्कम टॅक्स भरणारा नसावा.
:-EPFO आणि ESIC चे सदस्य नसावेत,
- ई-श्रम-कार्ड साठी लागणारी कागदपत्र,
- आधार कार्ड (आधार कार्ड फोन नंबरशी link असावं)
- फोन नंबर
- बँक पासबुक
- ई-श्रम-कार्ड चे फायदे,
:- प्रधानमंत्री सुरक्षा विमा अंतर्गत २ लाखाचा विमा दिला जातो,
:- प्रत्येक कामगाराला एक ओळखपत्र दिले जाते हे एक खास महत्वाचे क्रमांक म्हणून ओळखले जाते,
:- या माहितीच्या आधारे आपलं सरकार सामाजिक कल्याण व सुरक्षा योजना राबवल्या जातात,
:- येणाऱ्या सर्व सरकारी योजना चा पहिला सर्वात आधी ई-श्रम-कार्ड धारकांना दिला जाईल,
:-कामगाराच्या कार्यशक्तीच्या आधारे त्यांच्या रोजगारांच्या जास्तीत जास्त संधी मिळवण्यात सरकार मदत करते,

Good
ReplyDeleteVery nice ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
ReplyDelete