Saturday, 6 May 2023

Digital INDIA||पंतप्रधान आभा कार्ड योजना,




  •  माननीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून digital India सुरुवात झालेली आहे आभा health card हे आयुष्यमान भारत digital mission चा एक भाग असून या कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व रुग्णालयात मध्ये मोफत उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.


  • पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते digital mission चा शुभारंभ झाला होता 27 सप्टेंबर 2021 साली आभा हेल्थ कार्ड ची सुरुवात केली गेली होती.


  1. Digital health card ची माहिती.


  • या health card मध्ये तुमच्या आरोग्याचा संपूर्ण data असणार आहे हे आभा health card user त्यांच्या health संबंधित माहिती देण्याची परवानगी देते.
  • आधार प्रमाणे या health card वर 14 अंकी नंबर असतो त्याच्या मदतीने डॉक्टर्सला आपल्या आरोग्याची माहिती मिळेल जेणेकरून उपचार करण्याला वेळ लागणार नाही आणि पुन्हा पुन्हा बेसिक मेडिकल टेस्ट असतात त्या कराव्या लागणार नाहीत या कार्डच्या मदतीने आभा health card user त्यांच्या हेल्थ बाबतची माहिती ( public / private hospital, community health centre, health and welliness centre, ) हॉस्पिटल, क्लिनिक, बीमा कंपनी, ला देऊ शकतात ज्यामुळे आपल्याला देशभरातील रुग्णालयात उपचार घेण्याची सुविधा मिळते,


    2. आभा health card चे फायदे,


आबा health card user free digital axis देत असतं त्यामुळे तुम्ही आभा card user झाल्यास डॉक्टर कडे जाताना तुम्हाला जुनी कागदपत्रे किंवा आजारा बाबतची कागदपत्रे दाखवण्याची किंवा सांगण्याची गरज पडणार नाही या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला कोणता आजार आहे व त्यावर कुठले उपचार करायचे हे डॉक्टरांना लगेच कळते.

आभा card तुम्हाला opt in व opt out ची सुविधा देते.

गत user आरोग्य संबंधित योजना चा लाभ मिळतो तसेच त्यामुळे कुठलाही व्यक्ती हे कार्ड बनवू शकतो.

आयुष्यमान digital India card अंतर्गत आत्तापर्यंत 21.9 कोटी आभा हेल्थ कार्ड आयडी बनवण्यात आलेल्या आहे या योजने अंतर्गत 53 हजार 341 आरोग्य सेवा रजिस्टर करण्यात आले आहे याशिवाय वैद्यकीय क्षेत्रात 11 हजार 677 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा देखील रजिस्ट्रेशन करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत 40 पेक्षा जास्त डिजिटल आरोग्य सेवालाल जोडण्यात आली आहे असे समजते,


आबा health card साठी apply कसे करावे हे आपण step by step पाहणार आहोत पुढील प्रमाणे,



  • या website वर जा त्यानंतर create user आभा card नाव वर क्लिक करा त्यानंतर generate vai Aadhar वर click करा आता तुमच्या Aadhar card किंवा virtual ID वर नोंद करा त्यानंतर खाली scroll करा आणि  I agree वर क्लिक करा आणि खाली दिलेल्या caption भरा त्यानंतर submit वर click करा आता तुमच्या  smartphone वर एक OTP येईल तो नोंद करा आणि submit बटणावर click करा त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर रजिस्टर करत submit बटनावर click करा तुमच्याकडे आबा address बनवण्याचे option देखील येईल ते एका email ID सारखे असेल त्यानंतर तुम्ही तुमचे आभा card download करू शकता.



Wednesday, 3 May 2023

PMJAY||आता प्रत्येकाला आयुष्यमान योजना अंतर्गत मिळणार पाच लाखापर्यंत मोफत उपचार...!


  •  आता तुम्हाला सुद्धा मिळणार 5 लाखापर्यंत मोफत उपचार दर वर्षाला घरातील प्रत्येक व्यक्तीला....!


*आयुष्यमान ही योजना नेमकं काय ?

चला तर मग आपण माहीत करून घेऊया, आयुष्यमान ही योजना म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,
  •  (ABPM-JAY ) ही योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली आयुष्यमान भारत योजना अंतर्गत प्रत्येक कुटुंबासाठी दरवर्षी 5 लाखापर्यंत संरक्षण विमा दिला जातो 

*उदाहरणार्थ:- जर समजा तुमच्या कुटुंबापैकी तुमचं कोणीतरी आजारी पडलं तर त्याला ऑपरेशन साठी 4 लाखांचा खर्च येत असेल तर तो खर्च आयुष्यमान कार्ड तर्फे माफ होऊ शकतो पण तुमच्या घरातल्या त्या व्यक्तीकडे आयुष्यमान कार्ड असलं पाहिजे नाही म्हणलं तरी 10.74 कोटी कुटुंबे व 50 कोटी गरीब आणि गरजू जनता या योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून योजनेचा लाभ घेऊ शकतात,ही योजना भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली.

  • आयुष्यमान योजनेचे फायदे,
  1. सार्वजनिक आणि खाजगी प्रदा त्यांच्या नेटवर्क द्वारे स्थापित करण्यात आलेल्या रुग्णालयात दरवर्षी घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी पाच लाख रुपये किमतीचा आरोग्य विमा मिळेल,
  2. या योजनेमध्ये कुटुंब संख्या वय किंवा लिंग यावर काहीच प्रतिबंध नाहीत,
  3. रुग्णालयात लाभार्थ्यांसाठी विनामूल्य प्रवेश दिला जाईल,
  4. या योजनेचा लाभ हा पण पहिल्या दिवसापासून घेऊ शकतो यामध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तीन दिवस आणि रुग्णालयात भरती नंतरचा खर्च जसे की निदान आणि औषध याचा समावेश होतो,
  5. योजनेचे फायदे देशभरातील प्रत्येक नोंदणीकृत दवाखान्यामध्ये उपलब्ध आहेत जिथे लाभार्थी कॅशलेस उपचारासाठी कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी रुग्णालयात भेट देऊ शकतात,
  6. सेवांमध्ये औषधे उपचार पुरवठा निदान सेवा चिकित्सक खोलेश्वर इत्यादी सह उपचाराची संबंधित सर्व खर्च समाविष्ट आहे,


  • आयुष्यमान योजनेसाठी लागणारी पात्रता
  • १०.७४ कोटी वंचित व गरीब लाभार्थी कुटुंबांना अनुक्रमे ग्रामीण व शहरी भागातील व्यवसाय मापदंड लागु करून सामाजिक आर्थिक जात गणना ( ASECC ) च्या आकडेवारी आधारित निश्चित केले गेले आहे,
  • याव्यतिरिक्त अशी कुटुंब जी आधीपासूनच राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेत (ASECC) चा भाग नाही त्या कुटुंबांना या योजनेत समाविष्ट केले आहे,

  • आयुष्यमान कार्ड साठी अर्ज कसा करावा,
  • आयुष्यमान भारत योजनेत पात्र होण्यासाठी कोणतेही नोंदणी नाही, या योजनेनुसार ज्याची नावे सामाजिक आर्थिक जनगणनेच्या यादी (AESCC) 2011 मध्ये नोंदवली गेली आहे,
  • केवळ त्याच लोकांना आयुष्यमान योजनेचा लाभ घेता येईल एखादी व्यक्ती या योजनेसाठी पात्र असल्यास आणि योजनेचा लाभ घेऊ इच्छित असल्यास तो स्वतःचे नाव शासनाने केलेल्या अधिकृत शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात नोंदणी करू शकतो.
  • याशिवाय अर्जदार ( CSC ) मार्फत ऑनलाईन अर्ज करू शकतात.



  • आयुष्यमान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे,

  1. मतदान कार्ड 
  2. आधार कार्ड 
  3. रेशन कार्ड



*अधिक माहितीसाठी 14555/180011/ 565:- वर कॉल करू शकता.


*आयुष्यमान योजना link:- www.pmjay.gov.in

*आयुष्यमान योजना पात्रता link:- www.mera.pmjay.gov.in
                                              
आयुष्यमान कार्ड download:- setu.pmjay.gov.in/setu

Monday, 1 May 2023

अठरा वर्ष आतील मुलांना मिळणार 2250 रुपये, बाल संगोपन योजना



 बाल संगोपन योजना,

ही जी योजना आहे त्या योजनेचे नाव बालसंगोपन योजना आहे व ही योजना 2005 मध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार अंतर्गत सुरू करण्यात आली परंतु ही योजना पूर्णपणे महाराष्ट्र राज्यात निर्धातून राबवली जाते व महाराष्ट्रातील लाभार्थी च या योजनेचा लाभ घेऊ शकतात इतर राज्यातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, ही योजना महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीने राबवली जाते.

(या योजनेमधून प्रत्येक दर महिन्याला लाभार्थी बालकांना 2250 रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अगोदर अनुदानाची रक्कम ,1100 रुपये प्रीती महिना होती पण आता ही केंद्र शासनाने 1100 रुपये ऐवजी 2250 रुपये केली आहे.)

* आता पाहूया योजनेचा लाभ कोणा कोणाला        मिळतो,


  • निर्धार व गरजू बालक ज्या मुलाला आई किंवा वडील नसतील त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो,
  • मुलाला आई वडील दोन्ही नसतील त्या मुलाला पण या योजनेचा लाभ घेता येतो,
  • कोविड कालावधी त पालक गमवलेले मुलांना पण या योजनेचा लाभ घेता येतो,
  • जे परिवार आपल्या मुलांना संभाळण्यासाठी असमर्थ आहेत त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येतो,
  • ज्या बालकाचे पालक मानसिक रुग्ण आहेत ते बालके सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात, इत्यादी प्रकारचे मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात....!


  • या योजनेअंतर्गत एका मुलाला 2250 रुपये मिळतात तर एका वर्षाला 27 हजार रुपये मिळतात, हे पैसे वय 18 पूर्ण होईपर्यंत दर महिन्याला मिळतात.

* बाल संगोपन योजनेला लागणारी पात्रता,


  • लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे,
  • लाभार्थ्याचे वय अठरा वर्षाच्या आत मध्ये पाहिजे,
  • अर्जदार या योजनेच्या निकषात बसला पाहिजे,
  • एकाच कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांनाही या योजनेचा लाभ दिला जातो,


* बाल संगोपन योजना साठी लागणारी कागदपत्रे, 


  1. बालकाचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट,
  2. जन्माचा दाखला,
  3. आधार कार्ड,
  4. तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला,
  5. पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र (आई किंवा वडील मृत्यू दाखला),
  6. पालकाचा रहिवाशी दाखला,
  7. मृत्यूचा अहवाल म्हणजे पालकाचा मृत्यू कशामुळे झाला,
  8. रेशन कार्ड,
  9. मुलाचे पासपोर्ट फोटो दोन नग,
  10. पालकाची पासपोर्ट फोटो दोन,

  • सादर योजनेचा अर्ज भरून झाल्यावर हे कागदपत्रे अर्ज सोबत जोडावे फारच मंजूर करण्यासाठी आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी बालकल्याण समितीकडे सादर केला जातो व ती समिती अर्ज मंजूर करते,

  • तसेच बाल संगोपन योजनेची माहिती पाहण्यासाठी व अर्ज जमा करण्यासाठी तालुका पंचायत समिती ऑफिसमध्ये बाल संरक्षण अधिकारी यांना भेटावे किंवा तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय या ठिकाणी भेटावे.

Sunday, 30 April 2023

ESCY|| Eshrm card yojna || प्रत्येकाला मिळणार दोन लाख सुरक्षा विमा ई श्रम कार्ड योजना,



 आता प्रत्येकाला मिळणार 2 लाखा पर्यंत सुरक्षा विमा ई-श्रम-कार्ड योजनेमार्फत,

आज आपण आजच्या ब्लॉग मध्ये ई श्रम कार्ड योजने बद्दल जाणून घेणार आहोत.
  1. ई-श्रम-कार्ड म्हणजे काय ?
  2. ई-श्रम-कार्ड कसं काढतात ?
  3. ई-श्रम-कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती ?
  4. ई-श्रम-कार्ड चे फायदे काय ?

  • ई-श्रम-कार्ड माहिती,



  • 26 ऑगस्ट 2021 पासून ई-श्रम-कार्ड योजना सुरू करण्यात आली असून ती योजना केंद्र सरकार व रोजगार मंत्रालयात भारत सरकारकडून सुरू करण्यात आली आहे.

  • सर्वसामान्य जनते साठी म्हणजेच मजूर वर्गासाठी ही योजना आहे उदाहरणार्थ:-  सुतार, लोहार, गवंडी, शेतमजूर, भाजी विक्रेता, रिक्षाचालक, घरगुती काम करणाऱ्या महिला, सामान्य सेवा केंद्र, रस्त्यावरील विक्रेता, दूध घालणारी शेतकरी, स्थलांतरित कामगार, इत्यादी.....


  • ई-श्रम-कार्ड काढण्यासाठी लागणारी पात्रता,

:- ई-श्रम-कार्ड काढण्यासाठी तुमचे वय सोळा वर्षे ते 59 वर्ष       यादरम्यान असावे.
:-अर्ज करणारा व्यक्ती कुठलेही टॅक्स व इन्कम टॅक्स भरणारा     नसावा.
:-EPFO आणि ESIC चे सदस्य नसावेत,


  • ई-श्रम-कार्ड साठी लागणारी कागदपत्र,


  1. आधार कार्ड (आधार कार्ड फोन नंबरशी  link असावं)
  2. फोन नंबर 
  3. बँक पासबुक

  • ई-श्रम-कार्ड चे फायदे,


:- प्रधानमंत्री सुरक्षा विमा अंतर्गत २ लाखाचा विमा दिला जातो,
:- प्रत्येक कामगाराला एक ओळखपत्र दिले जाते हे एक खास महत्वाचे क्रमांक म्हणून ओळखले जाते,
:- या माहितीच्या आधारे आपलं सरकार सामाजिक कल्याण व सुरक्षा योजना राबवल्या जातात,
:- येणाऱ्या सर्व सरकारी योजना चा पहिला सर्वात आधी ई-श्रम-कार्ड धारकांना दिला जाईल,
:-कामगाराच्या कार्यशक्तीच्या आधारे त्यांच्या रोजगारांच्या जास्तीत जास्त संधी मिळवण्यात सरकार मदत करते,

Friday, 28 April 2023

घराचे स्वप्न होणार साकार प्रत्येकाला मिळणार घरकुल प्रधानमंत्री आवास योजना,



  • प्रगगगगगगगगगग आवास योजना,

आता घाबरायचं कारण नाही तुमचं आमचं स्वप्न साकार करणार आपलं सरकार या शबरी घरकुल योजना व रमाई घरकुल योजना व महात्मा फुले घरकुल योजना अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना  या योजने मुळे सर्वसाधारण कुटुंबियांना मिळणार घर. ही योजना अनुसूचित जाती जमातीसाठी असते या योजनेअंतर्गत आपल्याला काही निधी प्राप्त होतो तरी पुढील माहिती तपासा.
   

  • वैशिष्ट्ये,

  • आपल्याकडे स्वतःची जागा असणे गरजेचे आहे,
  • जागा असेल पण त्या जागी पक्के घर असेल तर आपण या योजनेस अपात्र ठरतात,
  • जागा असेल पण त्या जागी कच्चे घर असेल तर आपण या योजनेस पात्र ठरतात,
  • आपल्या जागेची नोंद ग्रामपंचायतीत असणे गरजेचे आहे,
  • जागेचा किंवा घराचा उतारा जोडणे गरजेचे आहे व जागा कमीत कमी 300 स्क्वेअर फुट पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे,
  • तुमच्याकडे जागा नसेल तर घाबरायचं कारण नाही दिनदयाळ योजनेअंतर्गत शासनाकडून 50,000 हजार रुपये अनुदान देण्यात येते,
  • आपल्याकडे 1,20,000 हजार च्या आत मधील तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला असावा,
  • तसेच जातीचा दाखला पण असावा आपल्याकडे जातीचा दाखला नसेल तर कार्यालयातून लवकर काढून घ्यावा तो आवश्यक आहे,
  • आपली जेव्हा ग्रामसभा भरते किंवा मासिक सभा भरते त्यावेळी तुम्ही एक अर्ज ग्रामसभेला करणे गरजेचे आहे या अर्जाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं प्रकरण पास करण्यास विनंती करावी, ग्रामसभेचा ठराव तुम्ही जर प्रकरणाला जोडला तरच तुमचं प्रकरण पुढे पास केलं जाईल अन्यथा प्रकरण अपात्र ठरविण्यात येईल,
  • 2022-2023 मध्ये एका घरकुलासाठी निधी 1,20,000 हजार असणार आहे


  •  * कागदपत्रे

  1.  रेशन कार्ड ,
  2. आधार कार्ड ,
  3. बँक पासबुक ,
  4. उत्पन्नाचा दाखला ,
  5. जातीचा दाखला ,
  6. जागेचे (पीटीआर) उतारा ,
 घरकुल यादी व घरकुल जीआर पाहण्यासाठी पुढील,
Link ला tap करा:- Pmaygnic.in

    

  • प्रधानमंत्री आवास योजना नाव नोंदणी करण्याचा फॉर्म पुढील प्रमाणे असतो,




Thursday, 27 April 2023

SHBA;आता प्रत्येक शेतकरी बांधवांना पी.एम.सी किसान योजना अंतर्गत सहा हजार (६०००) रुपये मिळणार.....!




आता प्रत्येक शेतकरी बांधवांना पी.एम.सी किसान योजना अंतर्गत सहा हजार (६०००) रुपये मिळणार.....!

शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आणि शेतकरी बांधव हा अन्नदाता आहे, म्हणूनच आपल् सरकार शेतकरी बांधवांसाठी नवीन नवनवीन योजना घेऊन येत असते ज्यामुळे शेतकरी बांधवाला फायदा होईल आज आपण अशाच एका योजनेबद्दल आपल्याला सांगणार आहोत, ज्याने आपल्या शेतकरी बांधवांना सहा हजार रुपयापर्यंत फायदा होऊ शकतो, या योजनेचे नाव म्हणजे पंतप्रधान किसान योजना व पीएमसी किसान योजना म्हणूनही ही योजना ओळखली जाते..

*:-वैशिष्ट्ये,🔖

:-ही योजना केंद्र सरकार योजना आहे,

:-ही योजना भारत सरकारने 1 डिसेंबर 2018 पासून सुरू केली आहे,

:-या योजनेमध्ये जमीन असणाऱ्या शेतकरी कुटुंबीयांना तीन समान टप्प्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाते,              (पती पत्नी व अठरा वर्ष आतील मुलं अल्पवयीन मुल यांना हा निधी दिला जातो असं कुटुंब योजनेसाठी पात्र ठरतं),

:-ही योजना जरी केंद्र सरकारची असली तरी राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेश प्रशासन संबंधित व्यक्तीचा पात्रता निश्चित करतात,

:-या योजनेचा निधी थेट शेतकरी कुटुंबीयांच्या बँक खात्यात जमा होतो,

:-सुरुवातीला फक्त असे शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकत होते ज्यांच्याकडे दोन हेक्टर शेती आहे पण आता जमीन कितीही असेल तरीपण शेतकरी बांधव इतर अटी त जर बसत असेल तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकतो,

*:-पात्रता,📝

(1) कुठलीही संस्था जिच्या नावे जमीन आहे ती संस्था अपात्र ठरते,

(2) पदावर असलेले म्हणजेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, इत्यादी या योजनेस अपात्र ठरतात,

(3) माझी किंवा विद्यमान खासदार, आमदार, मंत्री राज्यमंत्री, महापौर, किंवा जिल्हा पंचायत तिचे अध्यक्ष, इत्यादी या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत,

(4) जे सरकारी कर्मचारी आहेत हे या योजनेचा लाभ घेऊ शकतात पण फक्त चतुर्थ श्रेणी किंवा सहाय्यक कर्मचारी या योजनेसाठी पात्र ठरतात,

(5) सेवानिवृत्त कर्मचारी ज्याचे मासिक पेन्शन १०,०००₹ किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कर्मचारी या योजनेसाठी अपात्र ठरतात परंतु जे सरकारी कर्मचारी चतुर्थ श्रेणी व सहाय्यक कर्मचारी आहे त्यांचे पेन्शन १०,०००₹ पेक्षा जास्त जरी असेल तरीही ते या योजनेस पात्र ठरतात,

(6) ज्यांनी मागील वर्षात कर भरला आहे ते शेतकरी बांधव या योजनेस पात्र ठरतात,

(7) डॉक्टर, अभियंते, वकील, चार्ट अकाउंटंट, आणि वस्तूविशारद, यासारखे व्यवसायिक या योजनेतून वगळण्यात आलेली आहे,

(8) थोडक्यात सांगायचं म्हटलं तर या योजनेला फक्त असे व्यक्ती पात्र ठरतात ज्यांना त्या योजनेची खरोखरच गरज आहे, 

*:- लागणारी आवश्यक कागदपत्रे 📝

  1. बँक पासबुक,
  2. आधार कार्ड,
  3. ७/१२ किंवा ८ अ उतारा,
  4. मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक असावा,
  5. आधार कार्ड बँक अकाउंट ची लिंक असावं,

* :- नाव नोंदणी,

:- आपण स्वतः कागदपत्रे घेऊन तलाठी कार्यालयात जाऊन नाव नोंदणी करू शकता,

:- ग्राहक सेवा केंद्र व इंटरनेट कॅफे मध्ये ही जाऊन आपण नाव नोंदणी करू शकता मात्र तिथे आपल्याला काही रक्कम भरावी लागेल,

:-आपण स्वतः पीएम किसान पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करू शकता मात्र ते आपल्याला काळजीपूर्वक करावा लागेल.

P.M किसान पोर्टल link :-https://pmkisan.gov.in/



                                 

Digital INDIA||पंतप्रधान आभा कार्ड योजना,

 माननीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून digital India सुरुवात झालेली आहे आभा health card हे आयुष्यमान भारत digital mission चा...