बाल संगोपन योजना,
ही जी योजना आहे त्या योजनेचे नाव बालसंगोपन योजना आहे व ही योजना 2005 मध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार अंतर्गत सुरू करण्यात आली परंतु ही योजना पूर्णपणे महाराष्ट्र राज्यात निर्धातून राबवली जाते व महाराष्ट्रातील लाभार्थी च या योजनेचा लाभ घेऊ शकतात इतर राज्यातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, ही योजना महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीने राबवली जाते.
(या योजनेमधून प्रत्येक दर महिन्याला लाभार्थी बालकांना 2250 रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अगोदर अनुदानाची रक्कम ,1100 रुपये प्रीती महिना होती पण आता ही केंद्र शासनाने 1100 रुपये ऐवजी 2250 रुपये केली आहे.)
* आता पाहूया योजनेचा लाभ कोणा कोणाला मिळतो,
- निर्धार व गरजू बालक ज्या मुलाला आई किंवा वडील नसतील त्यांना या योजनेचा लाभ घेता येतो,
- मुलाला आई वडील दोन्ही नसतील त्या मुलाला पण या योजनेचा लाभ घेता येतो,
- कोविड कालावधी त पालक गमवलेले मुलांना पण या योजनेचा लाभ घेता येतो,
- जे परिवार आपल्या मुलांना संभाळण्यासाठी असमर्थ आहेत त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येतो,
- ज्या बालकाचे पालक मानसिक रुग्ण आहेत ते बालके सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात, इत्यादी प्रकारचे मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात....!
- या योजनेअंतर्गत एका मुलाला 2250 रुपये मिळतात तर एका वर्षाला 27 हजार रुपये मिळतात, हे पैसे वय 18 पूर्ण होईपर्यंत दर महिन्याला मिळतात.
* बाल संगोपन योजनेला लागणारी पात्रता,
- लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे,
- लाभार्थ्याचे वय अठरा वर्षाच्या आत मध्ये पाहिजे,
- अर्जदार या योजनेच्या निकषात बसला पाहिजे,
- एकाच कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांनाही या योजनेचा लाभ दिला जातो,
* बाल संगोपन योजना साठी लागणारी कागदपत्रे,
- बालकाचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट,
- जन्माचा दाखला,
- आधार कार्ड,
- तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला,
- पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र (आई किंवा वडील मृत्यू दाखला),
- पालकाचा रहिवाशी दाखला,
- मृत्यूचा अहवाल म्हणजे पालकाचा मृत्यू कशामुळे झाला,
- रेशन कार्ड,
- मुलाचे पासपोर्ट फोटो दोन नग,
- पालकाची पासपोर्ट फोटो दोन,
- सादर योजनेचा अर्ज भरून झाल्यावर हे कागदपत्रे अर्ज सोबत जोडावे फारच मंजूर करण्यासाठी आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी बालकल्याण समितीकडे सादर केला जातो व ती समिती अर्ज मंजूर करते,
- तसेच बाल संगोपन योजनेची माहिती पाहण्यासाठी व अर्ज जमा करण्यासाठी तालुका पंचायत समिती ऑफिसमध्ये बाल संरक्षण अधिकारी यांना भेटावे किंवा तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय या ठिकाणी भेटावे.

No comments:
Post a Comment