Wednesday, 3 May 2023

PMJAY||आता प्रत्येकाला आयुष्यमान योजना अंतर्गत मिळणार पाच लाखापर्यंत मोफत उपचार...!


  •  आता तुम्हाला सुद्धा मिळणार 5 लाखापर्यंत मोफत उपचार दर वर्षाला घरातील प्रत्येक व्यक्तीला....!


*आयुष्यमान ही योजना नेमकं काय ?

चला तर मग आपण माहीत करून घेऊया, आयुष्यमान ही योजना म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,
  •  (ABPM-JAY ) ही योजना 23 सप्टेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली आयुष्यमान भारत योजना अंतर्गत प्रत्येक कुटुंबासाठी दरवर्षी 5 लाखापर्यंत संरक्षण विमा दिला जातो 

*उदाहरणार्थ:- जर समजा तुमच्या कुटुंबापैकी तुमचं कोणीतरी आजारी पडलं तर त्याला ऑपरेशन साठी 4 लाखांचा खर्च येत असेल तर तो खर्च आयुष्यमान कार्ड तर्फे माफ होऊ शकतो पण तुमच्या घरातल्या त्या व्यक्तीकडे आयुष्यमान कार्ड असलं पाहिजे नाही म्हणलं तरी 10.74 कोटी कुटुंबे व 50 कोटी गरीब आणि गरजू जनता या योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून योजनेचा लाभ घेऊ शकतात,ही योजना भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केली.

  • आयुष्यमान योजनेचे फायदे,
  1. सार्वजनिक आणि खाजगी प्रदा त्यांच्या नेटवर्क द्वारे स्थापित करण्यात आलेल्या रुग्णालयात दरवर्षी घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी पाच लाख रुपये किमतीचा आरोग्य विमा मिळेल,
  2. या योजनेमध्ये कुटुंब संख्या वय किंवा लिंग यावर काहीच प्रतिबंध नाहीत,
  3. रुग्णालयात लाभार्थ्यांसाठी विनामूल्य प्रवेश दिला जाईल,
  4. या योजनेचा लाभ हा पण पहिल्या दिवसापासून घेऊ शकतो यामध्ये रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी तीन दिवस आणि रुग्णालयात भरती नंतरचा खर्च जसे की निदान आणि औषध याचा समावेश होतो,
  5. योजनेचे फायदे देशभरातील प्रत्येक नोंदणीकृत दवाखान्यामध्ये उपलब्ध आहेत जिथे लाभार्थी कॅशलेस उपचारासाठी कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी रुग्णालयात भेट देऊ शकतात,
  6. सेवांमध्ये औषधे उपचार पुरवठा निदान सेवा चिकित्सक खोलेश्वर इत्यादी सह उपचाराची संबंधित सर्व खर्च समाविष्ट आहे,


  • आयुष्यमान योजनेसाठी लागणारी पात्रता
  • १०.७४ कोटी वंचित व गरीब लाभार्थी कुटुंबांना अनुक्रमे ग्रामीण व शहरी भागातील व्यवसाय मापदंड लागु करून सामाजिक आर्थिक जात गणना ( ASECC ) च्या आकडेवारी आधारित निश्चित केले गेले आहे,
  • याव्यतिरिक्त अशी कुटुंब जी आधीपासूनच राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेत (ASECC) चा भाग नाही त्या कुटुंबांना या योजनेत समाविष्ट केले आहे,

  • आयुष्यमान कार्ड साठी अर्ज कसा करावा,
  • आयुष्यमान भारत योजनेत पात्र होण्यासाठी कोणतेही नोंदणी नाही, या योजनेनुसार ज्याची नावे सामाजिक आर्थिक जनगणनेच्या यादी (AESCC) 2011 मध्ये नोंदवली गेली आहे,
  • केवळ त्याच लोकांना आयुष्यमान योजनेचा लाभ घेता येईल एखादी व्यक्ती या योजनेसाठी पात्र असल्यास आणि योजनेचा लाभ घेऊ इच्छित असल्यास तो स्वतःचे नाव शासनाने केलेल्या अधिकृत शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात नोंदणी करू शकतो.
  • याशिवाय अर्जदार ( CSC ) मार्फत ऑनलाईन अर्ज करू शकतात.



  • आयुष्यमान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे,

  1. मतदान कार्ड 
  2. आधार कार्ड 
  3. रेशन कार्ड



*अधिक माहितीसाठी 14555/180011/ 565:- वर कॉल करू शकता.


*आयुष्यमान योजना link:- www.pmjay.gov.in

*आयुष्यमान योजना पात्रता link:- www.mera.pmjay.gov.in
                                              
आयुष्यमान कार्ड download:- setu.pmjay.gov.in/setu

1 comment:

Digital INDIA||पंतप्रधान आभा कार्ड योजना,

 माननीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून digital India सुरुवात झालेली आहे आभा health card हे आयुष्यमान भारत digital mission चा...